Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

आधी नगरसेवक म्हणून निवडून यावं, संजय राऊतांवर जोरदार टीका

संजय राऊत जम्मू काश्मीरच काय तर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचीही निवडणूक लढवतील
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. याच गोंधळादरम्यान काल शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूला गेले होते. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर एकच टीकेची झोड उठवली. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत येत्या काळात शिवसेना जम्मू काश्मीरची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केले. त्यावर आता पुन्हा टीका होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी यावरूनच राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

Sanjay Raut
'पंकजा मुंडेंना बदनाम करणारा एक गट भाजपमध्येच' बावनकुळेंचे मोठे विधान

संजय राऊत यांनी आधी नगरसेवक म्हणून निवडून यावं आणि नंतर जम्मू काश्मीरमधील निवडणुकांबाबत बोलावं, असं आव्हान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिलं. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही संजय राऊतांची खिल्ली उडवली. संजय राऊत जम्मू काश्मीरच काय तर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचीही निवडणूक लढवतील, एवढा कॉन्फिडन्स येतोच कुठून, असा सवाल शिरसाट यांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com