Nitin Deshmukh
Nitin DeshmukhTeam Lokshahi

मुख्यमंत्री कोण होणार? हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवले होते, नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

शिवसेना ठाकरे गटाच्या आवाज कुणाच्या या पॉडकास्टमध्ये बोलत असताना आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा मोठा गौप्यस्फोट केला.
Published by :
Sagar Pradhan

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. तेव्हापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच आहे. मात्र, शिवसेनेत बंडखोरी कशी झाली? याबाबत अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु, यावर अनेक वेळा भाष्य केले जाते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या आवाज कुणाच्या या पॉडकास्टमध्ये बोलत असताना आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केले, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण, सत्ता पाडायची एवढंच देवेंद्र फडणवीसांना माहिती होते. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

Nitin Deshmukh
Shivsena Teaser: बंडखोरीनंतरचा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन; शिवसेनेकडून टीझर प्रदर्शित

नेमकं काय म्हणाले नितीन देशमुख?

'आवाज कुणाचा' या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस सांगतात, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचे नाव सुचवले होते. हे पुर्ण चुकीचे आहे. सत्तांतराच्या एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: एकनाथ शिंदेंनी मला सांगितले होते. देवेंद्र फडणवीस माध्यमांना सांगतात, एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केले. मात्र, देवेंद्र फडणवीसांना सत्ता पाडायची, एवढंच माहिती होते. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवले होते. अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, 'आमची ओळखच शिवसेना आहे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. एकनाथ शिंदेंना ‘मातोश्री’ने घडवले. जिल्हाप्रमुख, आमदार, कॅबिनेमंत्री आणि मुख्यमंत्रीनंतरचं नगरविकास मंत्रीपद दिले. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना घडवले. त्यांच्याशी ते प्रमाणिक राहिले नाहीत. आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर गेले असतो, तर आमच्याशी किती प्रामाणिक राहिले असते. आमची ओळख फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com