Prakash Ambedkar | Uddhav Thackeray
Prakash Ambedkar | Uddhav Thackeray Team Lokshahi

वंचितसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले,चर्चा पॉझिटिव्ह...

प्रकाश आंबेडकर आणि आम्ही देखील पुढे कोणत्या विषयावर अडथळे येतील ते विषय सोडवूनच आम्ही एकत्र येऊ.
Published by :
Sagar Pradhan

ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आज पहिली बैठक झाली. त्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर माविआने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबतच्या युतीबाबत भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर आणि माझी जी काही चर्चा झाली ती चांगली नक्कीच पॉसिटीव्ह झाली आहे. असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Prakash Ambedkar | Uddhav Thackeray
ठाकरे गट- वंचित युतीवर शिंदे गटाची टीका; म्हणाले, जे कधी महापरिनिर्वाण दिनाला...

काय म्हणाले उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीबद्दल?

प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतच्या भेटीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि माझी जी चर्चा झाली ती नक्कीच चांगली पॉझिटिव्ह झाली आहे. युतीबाबत ज्या काही गोष्टी आहे बारकावे आहेत ते लवकरात लवकर संपवू म्हणजे पुढे जाऊन काही अडथळे येणार नाही. ते संपल्यानंतर आम्ही युतीच बोलू. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीत मानसिकता आहे. परंतु त्यांचे काही विषय आहे पण ते जटिल नाहीये ते विषय संपवून पुढे जाऊ.आम्ही तिघे देखील एकत्र येण्याआधी बसलो चर्चा केली. नंतर त्रास होणाऱ्या मुद्द्यावर भाष्य केले. ते सोडवले आणि पुढे गेली. त्यानंतर आम्ही एकत्र आलो. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही देखील पुढे कोणत्या विषयावर अडथळे येतील ते विषय सोडवूनच आम्ही एकत्र येऊ. परंतु आमच्यात तसे काही अडथळे येणारे विषय नाहीय पण आम्ही चर्चा करू. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com