Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Team Lokshahi

पूर्वीचे भाजपचे नेते वैचारिक दृष्ट्या परिपक्व अन् आताचे... जाधवांचा भाजपवर निशाणा

किरीट सोमय्या दुसऱ्यांवर आरोप करतो विक्रांतच्या बाबतीत मात्र जे पैसे जमवले गेले ते राज्यपालांपर्यंत पोहोचले का?
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच आरोप- प्रत्यारोप दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपसह भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. पूर्वीचे भाजपचे नेते वैचारिक दृष्ट्या परिपक्व होते. आताची टिकाटिप्पणी खालच्या पातळीची करतात. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Bhaskar Jadhav
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीवर अजित पवारांनी व्यक्त केली शंका

काय म्हणाले भास्कर जाधव?

माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, पूर्वीची भाजप आणि आत्ताची भाजप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पूर्वीचे भाजपचे नेते हे वैचारिक दृष्ट्या परिपक्व होते. त्यांची टिकटिप्पणी खालच्या लेवलची नसायची. अशा शब्दात त्यांनी सध्याच्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, किरीट सोमय्या दुसऱ्यांवर आरोप करतो विक्रांतच्या बाबतीत मात्र जे पैसे जमवले गेले ते राज्यपालांपर्यंत पोहोचले का? याचे उत्तर सोमय्याने पहिल्यांदा द्यायला पाहिजे आणि मगच दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले पाहिजेत. अशी टीका त्यांनी सोमय्या यांच्यावर केली. त्यानंतर बावनकुळे यांनी सोणन्याच्या चमचा बाबतचा केलेल्या वक्तव्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले. परवा मकर संक्रांत होती आणि कोणीतरी मला प्रश्न विचारला उद्या तिळगुळ द्यायचे तुम्ही कोणाला पहिले तर त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं बावनकुळे, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, या वाचाळ वीरांना पहिला तिळगुळ वाटेन किरीट सोमय्याला मात्र तिळगुळ देणार नाही. असे ते यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com