Chandrakant Khaire | PM Narendra Modi
Chandrakant Khaire | PM Narendra ModiTeam Lokshahi

'मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली' ठाकरे गटाचे नेत्याचे विधान

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली अशी टीका केली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांचा हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान याच दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका चालू आहे, त्यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीका केली आहे.

Chandrakant Khaire | PM Narendra Modi
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंची टीका; म्हणाले, अजेंडा...

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली अशी टीका केली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पाच मुख्यमंत्री आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे 2024 ला नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा आहे. कारण आगामी काळात मुंबई महानगरपालिकच्या निवडणुका असल्या कारणाने मतदार भुलवण्यासाठीच नरेंद्र मोदी मुंबईत आले. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून केले जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कोणतेही यश येणार नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com