महाजनांच्या विधानानंतर राऊतांचे मोठे विधान; म्हणाले, शरद पवारांमुळे शिवसेना फुटली...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. या सर्व घडामोडी दरम्यान भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीबाबत मोठे विधान केले होते. भाजपाने शिवसेना फोडण्यासाठी ‘ऑपरेशन’ राबवलं, असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होते. यावरूनच आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे लोक म्हणतात शरद पवारांमुळे शिवसेना फुटली, पण शिवसेना फुटावी हे पवाराचे स्वप्न नव्हते तर भाजपाचे जुने स्वप्न होते. गिरीश महाजन स्पष्ट बोलले. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पोटातील सत्या ओठावर आले. असे राऊत यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, भाजपाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. याचा आड शिवसेना येऊ शकते म्हणून पहिले ते शिवसेनेचे तुकडे करत आहेत. हेच भाजपाचे धोरण आहे. हे आमच्या खोकेबहाद्दर ४० आमदारांना कळाले नाही. अशाप्रकारे ते महाराष्ट्राबरोबर बेईमानी करण्याच्या कटात सामील झाले आहेत. अशी टीका राऊत यांनी भाजपवर यावेळी केली.