Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

राज्यपालांनी असे वक्तव्यकरून शिवाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केलाय - संजय राऊत

आता हे जोडे जमा करा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे वक्तव्य राजभवानावरुन होत आहे, आता तिथे जोडे गेले पाहिजे

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. राजकीय वर्तुळात नुसतं वादग्रस्त विधानाचे सत्र सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानाची चर्चा कमी होत नाही तर आज राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राजकीय मंडळींकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्याच विधानावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांसोबतच मनसेवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut
पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही, रोहित पवारांची राज्यपालांवर टीका

काय म्हणाले संजय राऊत?

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राज्यपालांना महाराष्ट्रापासून काय झाल ते मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांना काय झालं? कधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य, तर कधी काय, त्यांनी आज तर छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने नेते असं म्हटले आहे. त्यांनी असं बोलून शिवाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केलाय”, असा आरोप संजय राऊत यांनी राज्यपालांवर केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “राहुल गांधींनी वीर सावकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप, मनसे सारखे पक्ष तीव्र आंदोलन करत आहेत. जोडे मारत आहेत. आता हे जोडे जमा करा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे वक्तव्य राजभवानावरुन होत आहे, आता तिथे जोडे गेले पाहिजे, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे सपूत आहात. नाहीतर हे ढोंग आहे”, असा टोला त्यांनी भाजप आणि मनसेला लगावला.

Sanjay Raut
राज्यपालांच्या विधानावर मंत्री सामंतांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती...

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com