Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

शिंदे गटाच्या त्या दाव्यावर राऊतांंचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, बापाची न्यायालये...

केंद्रीय तपास यंत्रणांचा अमर्याद गैरवापर करून तुम्ही आम्हाला धमकावत असाल तर आम्ही तुम्हाला भीक घालत नाही.

राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. सत्तांतर झाल्यापासून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच शिंदे गटाकडून वारंवार ठाकरे गट नेते संजय राऊत यांना पुन्हा तुरंगात जाणार असा दावा केला जातो. त्यावरच आता संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut
'माझ्या निधीवर बदलून स्वतःचे नावं टाकले' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

काय म्हणाले संजय राऊत?

शिंदे गटाच्या दाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, विरोधकांच्या बापाची न्यायालये आहेत का? मला बेकायदीशर पद्धतीने अटक करण्यात आले. मागील काही महिन्यात अनेक नेत्यांना अटक करण्यात आले. या सर्व कारवाया बेकायदेशीर होत्या. न्यायालयानेच हे सांगितलेले आहे. अनिल देशमुख, चंदा कोचर या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांना न्यायालयाने सुनावले आहे. असे देखील राऊत यांनी प्रखरपणे सांगितले.

पुढे ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा अमर्याद गैरवापर करून तुम्ही आम्हाला धमकावत असाल तर आम्ही तुम्हाला भीक घालत नाही. अनिल परब यांच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर आहे. भाजपाने नेमलेले काही लोक प्रसिद्धी मिळावी म्हणून आमच्या विरोधात बोलतात. त्यानंतर अधिकारी दबावाखाली येतात. त्यानंतर कारवाई केली जाते. या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला कधीतरी द्यावीच लागतील. या धमक्यांमुळे पळून जाणारे आम्ही नाही. असा देखील इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com