Shivsena Thackeray Group Repaly To PM Modi
Shivsena Thackeray Group Repaly To PM ModiTeam Lokshahi

पंतप्रधानांचा पाय मुंबईतून निघत नाही तर ठाकरे गटाचे जोरदार प्रत्युत्तर; 'अफलातून खोट....

महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला म्हणता. तेव्हा ते एक गोष्ट अधोरेखित करतात. एकीकडे शिवसेना संपली, काँग्रेसकडे काही राहील नाही असच म्हणणारे आपलं पूर्ण भाषण महाविकास आघाडीवरून केंद्रित करतात.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. परंतु, त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सत्तातरानंतर पहिल्यांदा मुंबईत आले. यावेळी त्यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी आज त्यांच्याकडून अनेक विकास कामांचे देखील लोकार्पण करण्यात आले. परंतु, बीकेसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यावरच आता पंतप्रधान मोदींच्या टीकेला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Shivsena Thackeray Group Repaly To PM Modi
पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल पाकिस्तान वंशाच्या खासदाराचे विधान; यूकेच्या पंतप्रधान सुनक यांनी टोचले कान

लोकशाहीशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, मोदीजींकडून शिकलं पाहिजे अफलातून खोट कस बोलायचं आणि अंत्यत रेटून प्रभावीपणे आपलं खोटं म्हणणं कस खरं आहे पटवून देण्याचे कौश्यल्य मोदींचे आहे. आणि ते प्रचंड कौतुक करण्यासारखे आहे. अशी बोचरी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर यावेळी केली.

पुढे त्या म्हणाल्या की, जेव्हा मोदीजी असं म्हणता महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला म्हणता. तेव्हा ते एक गोष्ट अधोरेखित करतात. एकीकडे शिवसेना संपली, काँग्रेसकडे काही राहील नाही असच म्हणणारे आपलं पूर्ण भाषण महाविकास आघाडीवरून केंद्रित करतात. यावरून असं सिद्ध होत. ते घाबरतात, त्यांना माहिती आहे. पुढे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान राहू शकते. असं देखील अंधारे म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या काळात उद्द्योग बाहेर गेले नाही. उलट महाविकास आघाडीच्या काळात टीम फडणवीस अडचणी आणण्यास प्रयत्नशील होती. त्यामुळे आम्ही मोदींना सांगू इच्छितो. प्रभावशाली मुख्यमंत्र्यांच्या यादीत योगी नाव नाही आले. गुजरातचे आले नाही नाव आले ते उद्धव ठाकरेंचे आणि ते प्रचंड उल्लेखनीय आहे. अशा प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com