Nitin Deshmukh
Nitin DeshmukhTeam Lokshahi

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; देशमुख म्हणाले, राणे कुटुंब...

तुम्ही नारायण राणे, नितेश राणेंना घेऊन रात्री ८ ते १० दरम्यान नरीमन पॉईंटवर या असे आव्हान मी धमकी देणाऱ्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितलं.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ घडत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राणे कुटूंब असा वाद नेहमीच चर्चेत येतो. त्यातच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी आली. परंतु, यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी खळबळजनक विधान केले आहे. राणे कुटुंबाविरोधात बोलल्याने मला ही धमकी मिळाली, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

Nitin Deshmukh
'....त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला' शिंदे गटाची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका

काय म्हणाले नेमकं नितीन देशमुख?

आज सकाळी 11.30 ते दुपारी 12च्या दरम्यान मला दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले. त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंचं नाव घेऊ मला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही अनेक लोकांना मारून समुद्रात फेकून दिले आहे. त्यांचा अद्यापही पत्ता लागला नाही. तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुमचाही तसाच समाचार घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, मी मंगळवारी मुंबईला येत असून तुम्ही नारायण राणे, नितेश राणेंना घेऊन रात्री ८ ते १० दरम्यान नरीमन पॉईंटवर या असे आव्हान मी धमकी देणाऱ्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितलं. तसेच त्यासाठी ते उद्या मुंबईला जाणार असल्याची त्यांनी सांगितले. सोबतच मुंबईमध्ये आतापर्यंत बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या प्रकरणी नारायण राणे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार नितीन देशमुखांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com