चौकशीनंतर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रातील २४...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना त्यातच सत्तांतराच्यावेळी शिंदे गटातील आमदारांसोबत गेलेले. परंतु, गुवाहाटीला न जाता सूरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख यांची एसीबीकडून बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी आज चौकशी झाली. तब्बल सव्वा दोन तास एसीबीकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता एसीबीकडून देशमुखांची चौकशी पूर्ण झाली आहे. याच चौकशीनंतर नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले नितीन देशमुख?
चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, माझ्या विरोधात ‘एसीबी’कडे खोटी तक्रार देण्यात आली. हे एक षडयंत्र आहे. आपल्याला चौकशीसाठी हजर राहण्याविषयी नोटीस बजावण्यात आली होती. आपण कुठल्याही चौकशीला घाबरणार नाही. चौकशीला आज सामोरा गेलो, पण एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपण वाहनात डिझेल कुठून भरता, यासारखे सामान्य प्रश्न विचारले. हे आपल्यासाठी आश्चर्यच होते. खरे तर आपण जेव्हा सुरतहून गुवाहाटीला गेलो, तेव्हा चार्टर विमाने दिमतीला होती. हा खर्च कसा केला, याची विचारणा एसीबीने करायला हवी होती. असे देखील देशमुख यांनी मत मांडले.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील २४ मराठी लोकांना दबाव टाकून भाजपात घेण्यात आले. आज भाजपात गेल्यावर त्यांच्यावरील चौकशा का थांबल्या? त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही. त्यांना पोलीस संरक्षण कसे दिले जात आहे, हे महाराष्ट्रातील मराठी माणसाला समजायला हवे, असे देखील नितीन देशमुख यावेळी म्हणाले.