gajanan kirtikar
gajanan kirtikarTeam Lokshahi

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, खासदार गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश

खासदार गजानन किर्तीकर यांच्या शिंदे गटात प्रवेश झाल्याने शिंदे गटात खासदारांची संख्या वाढली.

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. शिवसेनेला आता पुन्हा एक धक्का बसला आहे. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार सोहळ्यात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. किर्तीकर यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ खासदार मानलं जात होते. पण त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

gajanan kirtikar
'अटक ही कायदेशीर कारवाई' आव्हाडांच्या अटकेनंतर मंत्री सामंतांची प्रतिक्रिया

गजानन किर्तीकर हे शिवसेनेत म्हणजेच ठाकरे गटात अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, याबद्दल स्पष्ट संकेत मिळत नव्हते. गजानन किर्तीकर काही दिवसांपूर्वी आजारी होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होती. त्यामुळे या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, शेवटी त्यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चांगला फायदा होणार आहे. परंतु, शिवसेना ठाकरे गटाला या प्रवेशाचा मोठा धक्का बसला आहे.

शिंदे गटात सामील झालेले एकूण खासदार

1. राहुल शेवाळे

2. भावना गवळी

3. कृपाल तुमने

4. हेमंत गोडसे

5. सदाशिव लोखंडे

6. प्रतापराव जाधव

7. धर्यशिल माने

8. श्रीकांत शिंदे

9. हेमंत पाटील

10. राजेंद्र गावित

11. संजय मंडलिक

12. श्रीरंग बारणे

13. गजानन किर्तीकर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com