राजकारण
राष्ट्रवादीसाठी विधिमंडळात एकच कार्यालय; दोन्ही गटाचे आमदार एकत्र बसणार?
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अजित पवार गट आणि शरद पवार गट याना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. राष्ट्रवादीसाठी विधिमंडळात एकच कार्यालय असणार आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे की, अजित पवार गट अन् शरद पवार समर्थक आमदार एकत्र बसणार का?