राज ठाकरेंना भेटल्याशिवाय जेवणार नाही; चिमुकल्याचा 'मनसे' बालहट्ट अखेर पुरविला

राज ठाकरेंना भेटल्याशिवाय जेवणार नाही; चिमुकल्याचा 'मनसे' बालहट्ट अखेर पुरविला

राज ठाकरेंना भेटण्यासाठी आजी आणि नातू सकाळपासून पाहत होते वाट

कल्पना नालस्कर | नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. मुंबईहून ते रेल्वेद्वारे नागपूरला पोहोचले आहेत. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथे आजी आणि नातू त्यांना भेटण्यासाठी सकाळपासून वाट पाहत आहेत. सहा वर्षाचा मुलगा राज ठाकरेंना भेटल्याशिवाय काही खाणार नाही, असा हट्ट धरला आहे. हा बालहट्ट आता राज ठाकरे यांनी पुर्ण केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या बोलण्याच्या, राहण्याच्या शैलीने जनसामान्यांमध्ये एक वेगळी प्रतिमा तयार करून आहेत. ते जनसामान्यांमध्ये किती प्रसिद्ध आहे आणि लोक त्यांना किती पसंत करतात याचे उदाहरण नागपूरमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. तिथे पाहायला मिळत आहे. एक सहा वर्षाचा चिमुकला आणि त्याची आजी सकाळपासून या हॉटेलमध्ये काही न खाता राज ठाकरेंच्या भेटीसाठी वाट बघत होते.

मंगला पत्की आणि अद्वैत पतकी असे त्या आजी-नातवाचे नाव आहे. जेव्हा राज ठाकरे यांना कळले. तेव्हा त्यांनी निरोप पाठवला की जोपर्यंत हा चिमुकला काही खाणार नाही तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही असं म्हटल्यावर मुलाने खाल्ले आहे. पण, त्यांची भेट घेण्यासाठी ते खाली उभे होते आणि राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली असून चिमुकल्याने त्यांची सही घेतली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे व औरंगाबाद येथे सभा घेतल्या होत्या. शेवटी झालेल्या औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सभेमध्ये राज ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने ते तितकेसे सक्रीय दिसले नाहीत. मात्र, शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा दौऱ्याची वाच्यता केली होती.

Lokshahi
www.lokshahi.com