...तो कुर्सी छोड़ दो; मोदी सरकारवर राज्यसभेत खर्गेंची खास कविता

संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेने केली.

नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य सहभागी झाले होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेने केली. या कवितेतून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले. अगर आपसे कुछ नहीं हो पाता है, तो आप कुर्सी छोड़ दें, असे सांगितले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे म्हणाले की, जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असताना देशाचा पाया रचला जात होता. आणि पाया दिसत नाहीत, भिंतीवर जे लिहिले आहे ते फक्त तिथेच दिसते. तुम्ही खूप दिलदार आहात, असे त्यांनी जगदीप धनखड यांना सांगितले. मी तुम्हाला संजय सिंग आणि राघव चड्ढा यांना परत बोलावण्याची विनंती करतो. सर्व दिग्गज नेते या सभागृहाचा भाग राहिले आहेत. श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाचे मत समान आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com