सज्ज पुन्हा शिवसेना... सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे खास ट्वीट
एक वर्षापूर्वी राज्यातील मोठा पक्ष असणारा शिवसेनेत बंडखोरी झाली. शिवसेनेतील 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदेंनी ही बंडखोरी केली होती. त्यामुळे विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ कमी झाल्यामुळे मविआचे सरकार धोक्यात आलं. दरम्यान सर्व राजकीय घडामोडीनंतर राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. आज या शिंदे- फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
काय आहे नेमका व्हिडिओ?
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन गट पडले. मात्र, शिवसेनेची सर्व सोशल मीडियाचे खाती ठाकरे गटाने स्वत: हाकडे ठेवली. त्यामुळे शिंदे गटाकडे अधिकृत सोशल मीडिया खातं नव्हते. दरम्यान, शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिंदे गटाने शिवसेनेचे अधिकृत सोशल मीडिया खाते लॉन्च केले. याच अधिकृत खात्यावरून शिवसेनेने सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना... आशीर्वाद शिवछत्रपतींचे, एक वर्ष सुराज्याचे.. असं ट्वीट शिवेसनेच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आलं आहे.