सत्तेची हवा डोक्यात जायला नकोच; काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना सुनावले

सत्तेची हवा डोक्यात जायला नकोच; काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना सुनावले

चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद वादग्रस्त ठरली. त्याचे पडसाद राज्यभरातील पत्रकारीता वर्तुळात उमटले.

संजय राठोड | यवतमाळ : भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यावर प्रथमच यवतमाळात आलेल्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद वादग्रस्त ठरली. पत्रकार सुपारी घेवून प्रश्‍न विचारत असल्याचा आरोपी वाघ यांनी केल्याने त्याचे पडसाद राज्यभरातील पत्रकारीता वर्तुळात उमटले. सत्तेची हवा डोक्यात जायला नको, अशा शब्दात महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी चित्रा वाघ यांना सुनावले.

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष झाल्यावर चित्रा वाघ यवतमाळ जिल्ह्यात आल्या. त्याचवेळी त्यांना मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भात विचारले जातील, हे माहित असायला हव होत. कारण राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, प्रश्‍न विचारताच वाघ यांचा तोल सुटला, त्यांनी केलेल्या निंदणीय वक्तव्याचा सव्वालाखे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com