आम्ही कधीही फुटलो नाही, त्याच पक्षात आहोत; सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद

आम्ही कधीही फुटलो नाही, त्याच पक्षात आहोत; सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील आजची सुनावणी संपली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील आजची सुनावणी संपली. सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून आक्रमक युक्तिवाद करत ठाकरे गटाचे मुद्दे खोडण्यात आले आहेत. यावेळी शिंदे गटाते वकील नीरज कौल यांनी संपूर्ण घटनाक्रमच न्यायालयासमोर मांडला. आम्ही पक्षांतर्गत फुटलो किंवा आम्ही विलीन झालो असा मी कधीही तर्क केला नाही. आम्ही शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करतो असे सांगितले आणि आता या प्रकरणात आम्हाला शिवसेना म्हणून ओळखले जाते, असे म्हणत शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी आम्हीच शिवसेना यांनी म्हंटले आहे.

आम्ही कधीही फुटलो नाही, त्याच पक्षात आहोत; सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद
संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ?

अपात्रतेसंदर्भात आम्हाला एकही नोटीस देण्यात आली नव्हती. आम्ही सुरक्षित नव्हतो म्हणून आम्ही राज्याबाहेर गेलो. आमची घरं जाळण्याची धमकी देण्यात आली. पक्ष म्हणून दावा करणं किंवा नवा पक्ष निर्माण करणं यामध्ये 10व्या सूचीत काही फरक नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नव्हता असे आमचे प्रकरण नव्हते. आमचा युक्तिवाद असा होता की तुम्ही महाविकास आघाडी युती सुरू ठेवू शकत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे. म्हणून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असे नीरज कौल यांनी म्हंटले आहे.

राजकीय पक्षाचा दर्जा राखण्यासाठी विधिमंडळ पक्ष मजबूत ठेवणं गरजेचं आहे. अध्यक्ष अपात्रतेचा निर्णय करतात तेव्हा पक्षातीत स्थिती पाहण्याची गरज त्यांना नसते. या यंत्रणांचं अधिकार क्षेत्र विचारात घेता आम्हाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातोय. जेव्हा बहुसंख्य आमदार असं सांगतात की मंत्रिमंडळाला बहुमत नाही. तेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणी घेणं. यात चुकीचे काय? राज्यपालाने आणखी काय करणे अपेक्षित आहे? सरकारला सभागृहात बहुमत आहे की नाही हीच त्यांची चिंता आहे. कोणताही मुख्यमंत्री कसा म्हणू शकतो की मी फ्लोर टेस्टला सामोरे जाणार नाही? 'फ्लोर टेस्ट' हा आपल्या लोकशाहीचा शिक्का आहे, असे म्हणत नीरज कौल यांनी संपूर्ण घटनाक्रमच न्यायालयात मांडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com