उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंच्या शिवसेनेत

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंच्या शिवसेनेत

सायंकाळी बाळासाहेब भवन येथे भूषण देसाईंचा पक्षप्रवेश

मुंबई : राज्यात अभुतपूर्व गोंधळ सुरु असतानाच उध्दव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भूषण देसाई आज सायंकाळी बाळासाहेब भवन येथे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यामुळे ठाकरेंच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली होती. यामुळे राज्यात सत्तांतर झाले. तर निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. अशातच उध्दव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण हा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

दरम्यान, चार महिन्याआधी भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरीचे आरोप केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com