....तर इतिहास माफ करणार नाही; मुनगंटीवारांची अजित पवारांवर टीका

....तर इतिहास माफ करणार नाही; मुनगंटीवारांची अजित पवारांवर टीका

शिंदे सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच, शिंदे सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे. आम्ही काय इतिहासातले संशोधक आहोत असा भाव जर प्रत्येकाने आणायचा ठरवला तर इतिहास माफ करणार नाही, अशी टीकाही मुनगंटीवारांनी केली आहे.

 ....तर इतिहास माफ करणार नाही; मुनगंटीवारांची अजित पवारांवर टीका
सहामाही परीक्षेत आम्ही पास झालो, आता वार्षिक परीक्षेत...: एकनाथ शिंदे

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मला स्वतःला व्यक्तिगत वाटतं संभाजी महाराज हे धर्मवीरच आहे आणि होते. औरंगजेब त्यावेळेला जेव्हा धर्म बदला असं म्हणत होता. तेव्हा, चाळीस दिवस अत्याचार संभाजी महाराजांनी सहन केले. त्यामुळे ते धर्मवीरच आहेत. आता या संदर्भात शब्दावरुन वाद करण्याऐवजी आता आपण सगळ्यांनी संभाजी राजांनी जो मार्ग दाखवला. त्या मार्गावरुन संकल्प करून पुढे जावं. आम्ही काय इतिहासातले संशोधक आहोत असा भाव जर प्रत्येकाने आणायचा ठरवला तर इतिहास माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

 ....तर इतिहास माफ करणार नाही; मुनगंटीवारांची अजित पवारांवर टीका
आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

खरंतर राजकारणामध्ये सत्ता गेल्याचे दुःख एवढा असू शकतं यावर माझा विश्वास नव्हता. मात्र, सत्ता गेल्यानंतर व्यक्ती एवढा दुःखी होतो की बोलताना तारतम्य राहत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांची सत्ता जाते आणि पुन्हा येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे अशांना तू सद्बुद्धी दे आणि ही दुःख सहन करण्याची शक्ती दे, असाही खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com