'जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही, त्यांनी राजकारण सोडून द्यावे'

'जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही, त्यांनी राजकारण सोडून द्यावे'

सुधीर मुनगंटीवारांची संजय राऊतांवर टीका

उदय चक्रधर | गोंदिया : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा प्लान होता, असा आरोप ठाकरे गटाचे मुखपत्र सामना संपादकीयमधून केला होता. याचवर भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. पक्ष फोडण्याचा डाव होता तर डाव होऊ देवू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फुटत आहे. जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून टाका, असा घणाघात सुधीर मुनगंटीवारांनी संजय राऊतांवर केली आहे.

'जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही, त्यांनी राजकारण सोडून द्यावे'
राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटलांची पटोलेंवर जहरी टीका

देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहित असेल, असे शरद पवारांनी म्हंटले होते. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, जर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आधीच माहित होत असतील तर कशाला पैसे खर्च करायचे? कोणीही व्यक्ती असा दावा करीत असेल तर आश्चर्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर, सामना हा वृत्तपत्र नसून शिवसेनेचा पॅम्प्लेट आहे. सामना हा जर वृत्तपत्र असता तर त्याच्यामध्ये सामान्यांचे प्रश्न आले असते, अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.

दरम्यान, बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मुंबईमध्ये येऊन भेट घेणार आहेत. यावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करत त्यांना स्वतःचे राज्य सांभाळत नाही. त्यांच्या राज्याचा प्रगतीचा वेग अजूनही कमी आहे. यांना मोदीजी नको आहेत. यांना स्वैराचारी सत्ता पाहिजे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com