मनसे-भाजप युतीबाबत राज ठाकरेंच्या दाव्यावर मुनगंटीवार म्हणाले...

मनसे-भाजप युतीबाबत राज ठाकरेंच्या दाव्यावर मुनगंटीवार म्हणाले...

राज ठाकरेही शिंदे-फडणवीस युतीत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

चंद्रपूर : भाजपकडून आपल्यालाही युतीची ऑफर असल्याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. यामुळे राज ठाकरेही शिंदे-फडणवीस युतीत सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते चंद्रपुरात माध्यमांशी बोलत होते.

मनसे-भाजप युतीबाबत राज ठाकरेंच्या दाव्यावर मुनगंटीवार म्हणाले...
आमदार प्रकाश सुर्वेंवर खंडणीचा आरोप? व्हिडिओ व्हायरल

भाजपच्या कोअर कमिटीत मनसेसोबत युतीची चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक स्तरावर चर्चा झाली असल्यास त्याची फडणवीस यांनाच माहिती असू शकेल, असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे.

तर, शरद पवारांशी माझी कधीही भेट झाली नाही. राज ठाकरे शरद पवार यांचे समर्थक-भक्त व शिष्यही होते. त्यामुळे शरद पवार काय म्हणतात हे राज ठाकरे यांनाच अधिक माहित असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, शरद पवार-अजित पवार भेटीवर राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी एक टीम आगोदर पाठवली, दुसरी जाईल हे मी तेव्हाच म्हणालो होतो. तुम्ही त्याकडे तेव्हा लक्ष दिलं नाही. 2014पासून हे सर्वजण एकमेकांना मिळालेले आहेत. फक्त शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा ‘चोर’डीया या नावावर मिळाली ही कमाल, असे त्यांनी म्हंटले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com