Sunil Deshmukh
Sunil DeshmukhTeam Lokshahi

प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजप दडपशाही करते; सुनील देशमुखांचा आरोप

माजी मंत्री सुनील देशमुख यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा अधिकार

सुरज दाहाट | अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदान सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे पहिल्या फेरीत निवडून येणार असल्याचा दावा देशमुखांनी व्यक्त केला. तर भाजपवरही कडाडून टीका केली आहे.

Sunil Deshmukh
जिथे दिसेल तिथे ठोका; बागेश्वर बाबांच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर मिटकरी आक्रमक

भाजप निवडणूक आयोगाला मानत नाही. लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजप दडपशाही करते. हिटलरशाही सारखी वागते. निवडणूक आयोगाला भाजप मानत नाही. त्यामुळे या निवडणुकीत जनता यावेळी भाजपला धडा शिकवणार, अशी प्रतिक्रिया सुनील देशमुख यांनी दिली

दरम्यान, अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला सकाळी आठ वाजता पासून सुरुवात झाली असून दहा वाजेपर्यंत 5.49 टक्के मतदान झाले आहे. विभागाच्या पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरू असून सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. अमरावती विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली व काही सूचना देखील केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com