सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो, तेव्हाच मुख्यमंत्रिपदावर...; सुनील तटकरेंचे वक्तव्य चर्चेत
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं शिंदे गटाकडून सारखं सांगितले जात आहे. अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेख केला जात आहे. यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत.
यातच आता सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे. पुण्यातील बालेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी सुनील तटकरे उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद अजितदादांना मिळावं, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र आता महायुती आम्ही उभी केली आहे.
राज्याच्या सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो, तेव्हाच मुख्यमंत्रिपदावरून स्पष्टता झाली आहे. तशी चर्चा झालेली आहे. आता आम्ही एनडीएचा घटक आहोत. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचाचा विषयच नाही. असे सुनील तटकरे म्हणाले.