राजकारण
अजितदादांचा 'तो' Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे
‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय शो आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय शो आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये अनेक कलाकार, राजकीय नेते हजेरी लावत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. अजित पवारांनी भाजपाबरोबर सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे सुप्रिया सुळे दुखावल्या गेल्या होत्या. याविषयी त्या कधीही बोलल्या नव्हत्या.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना अजित पवारांबरोबरचे काही फोटो दाखविण्यात आले. अजित पवारांबरोबरच्या हिडिओ पाहून सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाले आणि कार्यक्रम सुरु असतानाच त्या रडू लागल्या. सुप्रिया सुळेंचा हा व्हिडिओ अवधूत गुप्तेने सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.