अजित पवारांना मी रविवारी भेटले होते, शपथविधीविषयी त्यांनी मला…”, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
याच पार्श्वभूमीवर एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी रविवारी (२ जुलै) रोजी अजित पवारांना भेटले होते. आमच्यात बराचवेळ चर्चा झाली. पक्षाचे आमदार तिथे दादाला (अजित पवार) भेटायला येऊ लागले. मला वाटलं निवडणुकीची तयारी कशी करायची याची चर्चा करायला आले असावेत. दादाच्या मनात नेमकं काय चाललं आहे मला ठाऊक नव्हतं.
तसेच अजित पवारांच्या निर्णयाची शरद पवारांना काहीही कल्पना नव्हती. त्यांना पुसटशी कल्पना जरी आली असती तर त्यांनी पक्ष पुन्हा उभा करण्याची मोहीम सुरु केली नसती. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या