रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देतीयं, महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारने...; सुळेंची विनंती

रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देतीयं, महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारने...; सुळेंची विनंती

कोकणातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन तापले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी रत्नागिरीतील बारसू रिफानयरी प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली. कोकणातील रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देत आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्य सरकारने चर्चेला बसावे, असा आवाहनही सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.

रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देतीयं, महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारने...; सुळेंची विनंती
सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे; शिवेंद्रराजेंचे टीकास्त्र

सुप्रिया सुळे यांनी आधी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या कोकणातील रिफायनरी संघर्षाची गोष्ट मनाला वेदना देत आहे. विकास हा झालाच पाहिजे पण स्थानिक लोकांना ज्या पद्धतीची वागणूक मिळत आहे ती मराठी संस्कृती नाही. असा अन्याय जर महिलांवर आणि कष्टकऱ्यांवर होत असेल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे, त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, आजच्या दिवसानिमित्त राज्य सरकारने चर्चेला बसावे, अशी विनंतीही त्यांनी केली. चर्चेतून मार्ग निघतात. आपल्याला मिळालेल्या संविधानाच्या चौकटीत राहून राज्य सरकारने कोकणातील बांधवांना विश्वास द्यावा. त्यानंतर हा प्रकल्प पुढे घेऊन जावे. थोडा संवेदनशीलपणा राज्यसरकारने दाखवायला हवा, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कोकणातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन तापले असून आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काहीच दिवसांपुर्वी आंदोलकांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान पोलिस आणि आंदोलक आमने-सामने आले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यामध्ये काही महिलाही जखमी झाल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com