सुप्रिया सुळेंनी हात जोडून केली भाजपाला विनंती म्हणाल्या...
विकास माने, बीड
बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान सुळे यांनी केंद्र सरकारला लक्ष केले आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंडिया आणि भारतच्या नावावरून जनतेवर 14 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या नावामुळे आमचे विरोधक घाबरले असून ते इंडियाचे नाव भारत करू पाहत आहेत. पण आमची भाजपला विनंती असून आम्ही आमचे नाव भारत करतो तुम्ही इंडियाच ठेवा अशी विनंती सुळे यांनी केली. या चौदा हजार कोटीतून सरसकट महाराष्ट्राची कर्जमाफी होईल तर याच पैशातून शाळा हॉस्पिटल होतील. शिवाय महाराष्ट्रात पुरुषांना देखील एसटी मोफत होईल. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी टाकल्या जाणाऱ्या पेंडोलला एक कोटी रुपयांचा खर्च होतो. शासन आपल्या दारी म्हणजे दारात येऊन योजना दिल्या पाहिजेत. कार्यक्रम घेऊन कोटी रुपये खर्च कशासाठी? त्यामुळे या कार्यक्रमाला विरोध असल्याचं सुळे यांनी म्हटले आहे.