राजकारण
'त्या' भ्रष्टाचाराची चौकशी कराच, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू; सुळेंचे मोदी सरकारला आव्हान
संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारावर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप केले होते, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही भ्रष्टाचाराची चौकशी करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, असे थेट आव्हानच सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिले आहे.