राजकारण
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
अजित पवारांनी काका शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्तपणे झाली.
अजित पवारांनी काका शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट गुप्तपणे झाली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अनेकवेळा राजकीय मतभेद असतात. सरोज पाटील या शरद पवार यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. अनेकवेळा त्यांचे पती एन डी पाटील आणि शरद पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पण नात्यात कधीही अंतर पडले नाही.
मी त्या बैठकीत नव्हते, त्यामुळं त्यात नेमकं काय झालं ते मला माहिती नाही. कौटुंबीक नाती वेगळी आणि राजकीय मते वेगळी असल्याचे सुळे म्हणाल्या.चोरडिया आणि पवार कुटुंब यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ झालं आमचे संबंध असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.