अजित पवार भाजपसोबत जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपकडून...

अजित पवार भाजपसोबत जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपकडून...

राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे.

पुणे : राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत मोठा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे. तसेच, याआधीही अजित पवारांवर वारंवार आरोप करण्यात आले होतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अजित पवार भाजपसोबत जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपकडून...
भाजपसोबत जाणार का? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर

शरद पवार व उध्दव ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटाने टीकास्त्र सोडले आहे. याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कालची भेट ही कौटुंबिक होती. आमचे ते संस्कार आहेत. महागाई बेरोजगारी, कांद्याचा व शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. आमच्यावर मध्यमवर्गीय कुटुंबाचे संस्कार झालेत. मोठ्या माणसांच्या घरी जाणं यात लाचारी समजत नाही. याला प्रेम आणि नात्यातील ओलावा म्हणतात. अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारण्यांनी या भाषेत बोलणे आणि अपमान करणे, असे जोरदार उत्तर सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला दिले आहे.

तर, भाजप नेते चंद्रकात पाटील यांचं विधान अतिशय दुर्दैवी आहे. चंद्रकांत पाटलांनी असे बोलणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आम्ही विरोधात होतो तरी बाळासाहेब यांच्याबद्दल माझ्या मनात लहानपणापासूनच प्रेम होते. बाळासाहेब ठाकरे यांचा स्टेटमेंट रेकॉर्डवर असताना पाटलांनी असे बोलणे हे दुर्दैवी. देशातून महाराष्ट्राच महत्व कमी करण्याचं षडयंत्र सुरू आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. फक्त टीव्हीवर येऊन टीका करण्याचं काम मुख्यमंत्री कडून केलं जात आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं जातं नसल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com