'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण

'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अजित पवारांविरोधात भाजपने ठिकठिकाणी आंदोलने केली असून राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे.

'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण
प्रकाश आंबेडकर नेहमीच कॉंग्रेसला ब्लॅकमेल करतात; पटोलेंचा गंभीर आरोप

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडले का? रोज टीव्ही वर कशाला यायला हवं. मुख्य मागणीला बगल द्यायचं. हेच तर सुरुये, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो अधिकार असल्यानं त्यात गैर काय, असे म्हणत त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादाबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशा वेळी कैलासवासी अरुण जेटली मला आठवतात. तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना विनम्र आवाहन आहे, आपल्या गलिच्छ राजकारणासाठी, कोणत्या ही विषयासाठी महिलेविषयी कोणी ही बोलू नये. हात जोडून मी विनंती करते, महाराष्ट्राची परंपरा आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होते. त्यामुळं या सर्वांचा विचार करून. स्वतःला आवरलं पाहिजे. त्यामुळं मला अशा विषयी मला प्रतिक्रिया विचारली की आधीपासूनच हीच विनंती करत आलेले आहे. मुळात मला जनतेनं निवडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी आणि विजेचा तुटवडा हे प्रामुख्याने आव्हान आहेत. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com