बागेश्वर बाबांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, जे लोक असे...
काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज बागेश्वर बाबा हे प्रचंड चर्चेत आले आहे. त्यातच आज ते पुन्हा एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. आक्षेपाहार्य विधान बागेश्वर बाबा यांनी केले आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातून आता या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
बागेश्वर बाबा यांच्या विधानावर बोलताना त्या म्हणाल्या की, धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीच आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया सुळेंनी यावेळी दिली.
काय होते बागेश्वर बाबाचे आक्षेपाहार्य विधान?
संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय. असे विधान त्यांनी केले आहे.