Video : सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, पुण्याच्या कार्यक्रमातील घटना

सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. यादरम्यान एका उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी दीपप्रज्वलन करताना सुळे यांच्या साडीने पेट घेतला. मात्र ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुप्रिया सुळे यांनी बाजूला होत लगेच साडीला लागलेली आग विझवली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com