जितेंद्र आव्हाड हे राजकारणातले राखी सावंत; कोण म्हणाले असं?

जितेंद्र आव्हाड हे राजकारणातले राखी सावंत; कोण म्हणाले असं?

राष्ट्रवादीत आता ढेरीवरून जुंपल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली होती. यावरुन जितेंद्र आव्हाडांनी एक फोटो शेअर करत ढेरी वाढली, असं म्हणत अजित पवारांना डिवचले होते.

मुंबई : राष्ट्रवादीत आता ढेरीवरून जुंपल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली होती. यावरुन जितेंद्र आव्हाडांनी एक फोटो शेअर करत ढेरी वाढली, असं म्हणत अजित पवारांना डिवचले होते. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर देत आता पोट वाढलं तर त्याला मी काय करु, असे म्हणाले होता. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आव्हाडांवर टीका करताना त्यांची राखी सावंतशी तुलना केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे राजकारणातले राखी सावंत; कोण म्हणाले असं?
नवाब मलिकांवरुन सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; दानवेंच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

सूरज चव्हाण म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात. चित्रपटसृष्टीमध्ये राखी सावंत नावाची अभिनेत्री आहे. तिची ज्याप्रमाणे सवय आहे वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणे. त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड हे करतात. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातले राखी सावंत आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांना एक दिवस दादा मला माफ करा माझे चुकले ही म्हणण्याची वेळ येईल, असाही दावा सूरज चव्हाणांनी केला आहे.

रोहित पवार यांची संघर्ष यात्रा शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी काढली आहे का महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी काढले आहे हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. त्यांचे संघर्ष यात्रेमधील फोटो आणि व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे असं वाटतं की ती यात्रा नसून या यात्रेला जत्रेचे स्वरूप आले आहे. लोकांना काढलेली यात्रा पिक्चर आणि ड्रामा वाटत आहे या यात्रेकडे लोकांनी पाठ फिरवली आहे, अशी टीका त्यांनी रोहित पवारांवर केली आहे.

या संदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षाकडे अधिकृतपणे मागणी केली होती आणि मागणी केल्यानंतरच ते कार्यालय आम्हाला भेटले आहे. परंतु, जाणीवपूर्वक जितेंद्र आव्हाड यांनी तिथे जाऊन आपल्या नावाची पाटी लावली होती, असा दावा त्यांनी केला आहे. हे विधिमंडळ म्हणजे कळवा मुंब्रा मतदार संघ आहे कुठेही काही केलं तरी चालते असे जितेंद्र आव्हाड यांना वाटले होते. त्यांनी केलेले हे कृत्य निषेधार्थ आहे, असेही चव्हाण म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com