फडणवीस शिंदे गटाचा गेम करणार; अंधारेंचा घणाघात: म्हणाल्या, 40 भाऊ उपाशी देवेंद्र तुपाशी

फडणवीस शिंदे गटाचा गेम करणार; अंधारेंचा घणाघात: म्हणाल्या, 40 भाऊ उपाशी देवेंद्र तुपाशी

अब्दुल सत्तार, मंत्री संदिपान भुमरे यांना टार्गेट केल्यानंतर सुषमा अंधारेंची आज औरंगाबादमध्ये सभा आहे. याआधी त्यां नी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

औरंगाबाद : मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदिपान भुमरे यांना टार्गेट केल्यानंतर सुषमा अंधारेंची आज औरंगाबादमध्ये सभा आहे. याआधी त्यां नी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. एकनाथ शिंदे बिन पगारी फुल अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचा गेम करण्याचा निर्णय घेतला आहे. 40 भाऊ उपाशी देवेंद्र तुपाशी, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमची महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे. महाप्रबोधन यात्रेत विचारलेले प्रश्नांचे घाव वर्णी लागतोय. मंत्री भुमरेंचा शरद सहकारी कारखाना हा मनी लॉड्ररिंगचा अड्डा झाला आहे. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी मनी लॉडरिंगचे पुराव्यांसाठी माझ्याकडे यावे. संदीपान भुमरे हे वेडे बनण्याचा सोंग करतात. माझं चॅलेंज आहे. संदीपान भुमरे यांनी मंजूर केलेले पाणंद रस्ते पूर्ण करावेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तसेच, भुमरे यांचे म्हणणे योग्य मी अंधारात आले. कारण स्ट्रीट लाईट लावले नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

जी काही महत्वाचे खाते आहेत तर मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री खाते फक्त नावाला, अधिकार सर्व उपमुख्यमंत्री यांच्याकडेच आहेत. एकनाथ शिंदे बिन पगारी फुल अधिकारी आहेत, अशा शब्दांत अंधारेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. धोरणात्मक निर्णय दिसत नाही. ते घ्यावे लागतात. मंत्र्यांना पोजिशन दिली. मात्र, पॉवर दिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचा गेम करण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरीचा डाग लावून घेऊन काय मिळाले, कशासाठी केला होता अट्टाहास. दिवस हे उपाशी गेले. 40 भाऊ उपाशी देवेंद्र तुपाशी, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com