राज्यपालांच्या विधानावर भाजपची दातखिळी बसली का? सुषमा अंधारेंचे टीकास्त्र
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्यापालांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांवर भाजपची दातखिळी बसली का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी बोलले त्यांचे समर्थन शिवसेना करत नाही. मात्र, राज्यपाल बोलल्यावर भाजपची दातखिळी बसली का? राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आरडाओरडा करणारे, राज्यपालांनी वक्तव्य केले तेव्हा यांचा गळा थांबला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यपालांच्या उपमुख्यमंत्री यांनी लक्षात आणून दिले पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हाय पॉवर विषयावर उद्या बैठक असून चर्चेला जाणार आहे. भेटीचा फार काही अर्थ काढण्याची गरज नाही, असे त्यांनी आजच स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.