अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली; सुषमा अंधारेंचे टीकास्त्र, फडणवीसांचे मौन...

अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली; सुषमा अंधारेंचे टीकास्त्र, फडणवीसांचे मौन...

राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता.

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून मी राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे गट व भाजपवर निशाणा साधाला आहे.

अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली; सुषमा अंधारेंचे टीकास्त्र, फडणवीसांचे मौन...
मुख्यमंत्री म्हणजे करप्ट मॅन; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यानिमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. त्यांची घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात, असा टोला सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला लगावला आहे. त, महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे.

अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर भाजपकडून हे केले जात आहे. फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते. स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणे थांबणार नाही. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, असा खोचक सल्लाही सुषमा अंधारेंनी दिला आहे.

दरम्यान, भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम लावला आहे. कारण नसाताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकाऱ्यांबद्द्ल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरु आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीचेच आहोत. राष्ट्रवादीतच राहणार आहोत. हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे अजित पवारांनी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com