रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झालीयं का? अंधारेंचा फडणवीसांना खोचक प्रश्न

रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झालीयं का? अंधारेंचा फडणवीसांना खोचक प्रश्न

शिंदे गट-भाजपने उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून घेतला असल्याचे उध्दव ठाकरेंनी म्हंटले होते. यावरुन शिंदे गट-भाजपने उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झाली आहे का, असा खोचक प्रश्न अंधारेंनी भाजपला विचारला आहे. तसेच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजीनाम्याचे उदाहरण देत शिंदे-फडणवीसांना टोलाही लगावला आहे.

रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झालीयं का? अंधारेंचा फडणवीसांना खोचक प्रश्न
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणूक आयोगाने...

रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झाली आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी निकाल पुन्हा वाचावा. भरत गोगावले यांची नियुक्ती चुकीची असल्याच त्यात म्हंटलं आहे, त्यांनी काढलेला व्हीप आणि व्होटींग देखील बेकायदेशीर आहे. यामुळे सरकार देखील बेकायदेशीर आहे. अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. ते एकत्र गेले नाहीत. थोडे-थोडे करुन गेले आहेत. याचिका दाखल केल्याचा ३ महिन्याच्या आत म्हणजे रिझनेबल पिरीड असतो. पक्ष आमचा आहे, असा दावा एकनाथ शिंदे करु शकत नाही. तो उद्वव ठाकरे यांचाच आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.

फडणवीस साहेब व भाजप नेत्यांची अभ्यास करावा. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं, लोकसभेत भाषण करत असताना मंडी सजी हुई थी, बाजार सजा हुआ था. बोली भी तय थी, मगर हमने खरिदना मुनासीब नही समजा, इससे बेहतर है की मैं अपने पद का अस्ताना देता हूं. तुम्हाला तुमच्याच नेत्यांवर प्रश्नचिन्ह लावायचे आहेत का? महाप्रबोधक सभेत मी अटल बिहारींचा व्हिडीओ लावेन. दोघांनीही राजीनामे दिले अटल बिहारी वाजपेयी आणि उद्धव ठाकरे यांनी. त्यांच्या नैतिकतेच्या आसपास देखील शिंदे भटकू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांच्यासमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडल्या असत्या तर जास्त योग्य ठरले असते, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. यावर सुषमा अंधारेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. दादा आमच्या हक्काचे आहेत. मी त्या कार्यक्रमात दादांच्या नावाचा उल्लेख केला नाही. सभागृहात माझ्या वतीने बोलावं. विरोधीपक्ष नेत्याने बोलावे. मग ते एकटे आहेत का? ती अपेक्षा सगळ्यांकडून आहे. दादा तुम्ही आम्हाला पारख करु नका, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com