राणे कुटुंब भाजपमध्ये जाताच सोमय्यांची स्क्रिप्टच बदलली; अंधारेंनी अख्ख रेकॉर्डच काढलं

राणे कुटुंब भाजपमध्ये जाताच सोमय्यांची स्क्रिप्टच बदलली; अंधारेंनी अख्ख रेकॉर्डच काढलं

किरीट सोमय्या यांच्याविरोधात सुषमा अंधारे आक्रमक

मुंबई : स्वच्छता दुत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली ती परिषद म्हणजे बंबाट्या मारणे सारखी होती. ईडीच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली आहे का? असा आत्मविश्वास त्यांना होता की काय असं वाटत होतं, असे टीकास्त्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सोडले आहे. सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर घणाघात केला. तसेच, ईडीविरोधात ठाकरे पक्ष जेल भरो आंदोलन करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

राणे कुटुंब भाजपमध्ये जाताच सोमय्यांची स्क्रिप्टच बदलली; अंधारेंनी अख्ख रेकॉर्डच काढलं
देशात आता डोळा मारण्यासाठी अजित पवार प्रसिध्द; शिंदे गटाच्या नेत्याचे टीकास्त्र

भाजप ब्लॅकचे व्हाईट करण्याचे यंत्र आहे का? सोमय्या राजकारणी कमी माहिती अधिकारी जास्त आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर त्यांनी आरोप केला होता. सरनाईक यांनी शरणागती पत्कारली आणि त्यांनी तिकडे प्रवेश केला. आनंद अडसूळ, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक यांच्या बद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतल्या होत्या. ज्या खेड प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली या प्रकरणात पण सोमय्या यांनी ११ वेळा या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. सोमय्या ईडीचे कर्मचारी आहेत का, असा खोचक सवालही त्यांनी विचारला. प्रत्येक माणसाला घाबरवल जात आहे. हडप्पा संस्कृतीपेक्षाही सोमय्या मोठे संशोधक आहेत. यामुळे सोमय्यांनी ते १९ बंगले शोधावेत, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

यशवंत जाधव यांच्या प्रवेशाना डायरी गायब झाली तशी सदानंद कदम यांची होईल का? जर ते भाजपात आले तर? सोमय्या यांनी नारायण राणे कुटुंबावरही आरोप केले होते, त्याच काय झालं? राणे कुटुंब भाजपमध्ये जाताच सोमय्या यांची स्क्रिप्ट बदलली. किरीट सोमय्या यांनी अनेक जणांवर आरोप केले पणं पुढे काय झालं, अशी विचारणाही अंधारेंनी केली आहे.

ईडीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहेत, अशी घोषणा करत सुषमा अंधारे यांनी याबद्दलची लवकरच तारीख सांगू, असे म्हंटले आहे. ईडीला न्यायालयात प्रश्न विचारावे लागतील. ईडीच्या चुकीच्या कारवाई विरोधात शिवसेना ठाकरे गट न्यायालयात जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, ईडीच्या गैरवापराविरोधात नऊ पक्षांनी पंतप्रधान यांना पत्र लिहिले आहे. घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांना हे पत्र लिहलेले आहे, त्यांनीच उत्तर दिले पाहिजे. जर ते उत्तर देणार नसतील तर किमान सेक्रेटरीने उत्तर दिले पाहिजे. पंतप्रधान हे भाजपचे नाहीत. त्यांच्याकडून उत्तर नाही पण भाजपचे प्रवक्ते उत्तर देत आहेत, असेही सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com