Sushma Andhare : जर त्यांनी गुवाहाटीचा खर्च केला असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत

Sushma Andhare : जर त्यांनी गुवाहाटीचा खर्च केला असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत

एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदारांनी सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास केला होता.
Published by  :
Siddhi Naringrekar

एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदारांनी सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास केला होता. गुवाहाटी, सूरतचा, चार्टर्ड प्लेनचा खर्च कुणी केला? आमची दसऱ्याची सभा त्यांनी ढापण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात १० कोटी रुपये एसटीला देण्यात आले होते. कोणताही पक्ष अस्तित्वात नसताना हे पैसे कुठून दिले गेले होते? यावर चर्चा व्हायला हवी. हा सरकारी खर्च होता की कुणाच्या खोक्यातून आला होता? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यांच्या या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, गुवाहाटीचा खर्च मी केला होता. असे संजय गायकवाड म्हणाले. यावर उत्तर देत सुषमा अंधारे म्हणाल्या की, चांगली गोष्ट आहे. जर त्यांनी गुवाहाटीचा खर्च केला असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. एवढं अंगावर घेतलं तरी तुमचे मंत्रिपदासाठी नाव नाही. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare : जर त्यांनी गुवाहाटीचा खर्च केला असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत
गुवाहाटीचा खर्च मी केला होता; शिंदे गटाच्या 'या' आमदारानं सांगितले...

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com