राजकारण
कुणीही यावं अन् टपली मारून जावं...; सुषमा अंधारेंची टीका
आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. यावरुन आता सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. आवडत्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी तानाजी सावंत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींना तानाजी सावंत सुनावत होते. मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, असंही सावंत जाहीर बोलत असल्याचं दिसतं आहे. यावरुन आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.