दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही; सुषमा अंधारेंची राणेंवर खोचक टीका

दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही; सुषमा अंधारेंची राणेंवर खोचक टीका

शिवसेनेची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु असून यातून शिवसेना नेत्यांने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडताना दिसत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरात शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

कोल्हापूर : शिवसेनेची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरु असून यातून शिवसेना नेते सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरात शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांवर त्यांनी खोचक टीका केली.

 दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही; सुषमा अंधारेंची राणेंवर खोचक टीका
'मोदी सरकार महागाईवर ‘कागदोपत्री’ फुंकर घालून जनतेची दिशाभूल करतीये'

सुषमा अंधारे म्हणाल्या की, दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही. ही विचारानंही बारकी असलेली ही पोरं कोणत्याही भाषेत बोलतात. पण, देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

तसेच, यावेळी अंधारेंनी गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानांचाही समाचार घेतला आहे. गुलाबराब सध्या बावचळलेलं आहेत, त्यांच्यावर मी काही बोलत नाही. तर, अब्दुल सत्तार महिलांच्या बाबतीत काहीही बोलतात पण त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस कारवाई का करत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही; सुषमा अंधारेंची राणेंवर खोचक टीका
जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले, एखाद्या बाईला पुढे करुन...

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. तर, सर्व पक्षाकडून सत्तारांच्या विधानाचा निषेध करण्यात आला होता.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com