शिंदेंची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश

शिंदेंची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसतात. परंतु, आता अंधारे कुटुंबात फूट पडली आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिंदेंची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश
दोन वर्ष अन् दोन महिने मीच पक्का कृषी मंत्री; अब्दुल सत्तारांचे विधान

सुषमा अंधारेंचे पती अ‍ॅड. वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटासाठी हा धक्का मानण्यात येत असून राजकीय मैदानात आता पती-पत्नी आमने-सामने पाहायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले, आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

शिंदेंची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश
खुज्या नेतृत्वास लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोल काय समजणार; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर टोला

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी सातत्याने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन टीकास्त्र सोडले. त्यांना अडवण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी करत त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांना सामील केली असल्याची चर्चा आहे. परंतु, शिंदे गटाची ही खेळी यशस्वी होणार का, सुषमा अंधारे यांची तोफ थंड पडणार की अधिक आक्रमक होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com