India Vs Ireland
India Vs IrelandTeam Lokshahi

T20 WOrld Cup Woman: भारताचा आयर्लंडवर 5 धावांंनी विजय; विजयासह थेट उपांत्य फेरीत धडक

भारतीय संघाने दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती.

महिला टी -20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना आयर्लंडसोबत झाला. या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडवर 5 धावांंनी विजय मिळवला आहे. चालू सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं आहे. या विजयासोबतच भारतीय महिला संघाने T20 विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. त्यात स्मृती मानधना आपल्या शतकापासून हुकली. 56 चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून ती बाद झाली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. प्रत्युत्तरादाखल खेळताना पावसामुळे खेळ थांबेपर्यंत आयर्लंडच्या संघाने 8.2 षटकांत दोन गडी गमावून 54 धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा डकवर्थ लुईस पद्धतीनुसार भारत पाच धावांनी पुढे होता. म्हणजेच आयर्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर 8.2 षटकात 59 धावा करायच्या होत्या. डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंड पाच धावांनी मागे होता आणि हे निर्णायक घटक ठरले. त्यानंतर भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com