Rupali Thombare Patil
Rupali Thombare PatilTeam Lokshahi

मी ईव्हीएमचा फोटो शेअर केला, पण... : रुपाली ठोंबरे पाटील

राष्ट्रवादीत्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची चर्चा

पुणे : राज्यात प्रतिष्ठीत बनलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. परंतु, कसब्यातून गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीत्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची चर्चा आहे. मतदानावेळी ईव्हीएम मशीनचा फोटो काढून त्यांनी फेसबुकवर शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Rupali Thombare Patil
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याकडून गोपनीयतेचा भंग; मतदानावेळी ईव्हीएम मशीनचा काढला फोटो

मुळात मी अजून मतदानच केलेले नाही. त्यामुळे मी गुन्हेगार होऊ शकत नाही. तो फोटो कसबा मतदारसंघातील एका मतदाराने पाठवला होता. यानंतर तो मी फेसबुकवर पोस्ट केला. मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेले नाही, असे स्पष्टीकरण रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिले आहे.

भाजपने गुन्हेगार आणले, भाजपने पैसे वाटले आहे. गंज पेठेत भाजपच्या माजी नगरसेवकाला काल मारले आहे. भाजप विकास मुद्द्यांवर बोलत नाही. ही निवडणूक जाती-धर्मावर आणली आहे, असे गुन्हे आम्हीही दाखल केले आहेत. कसब्यातील मतदार सूज्ञ आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला. यात ईव्हीएममध्ये रविंद्र धंगेकर यांच्या समोरील बटण दाबताना दिसत आहे. सोबतच, कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा, अशी पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. तर यावरुन विरोधकांनीही जोरदार टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com