सत्यजित तांबेंच्या प्रचारार्थ केला फोन, शिक्षकाने घेतली चांगलीच शाळा; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

सत्यजित तांबे यांनाच मतदान करण्यासाठी शिक्षकांना जातोय फोन

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस राहिले असून प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत. अशातच, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कार्यालयातील एका संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे.

या रेकॉर्डिंगमध्ये कार्यालयातून शिक्षकांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, शिक्षकांनी सत्यजित तांबे यांना मतदान का करावं? असं एका शिक्षकाने सुनावलं आहे. सुधीर तांबे यांना तीन वेळेस मतदान करुनदेखील पेन्शनचा प्रश्न सोडवला नाही, असा आरोप या ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे.

सत्यजित तांबे यांच्या कार्यालयातून शिक्षकांना फोन केला जात असून तांबे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. यावर एक शिक्षक भडकला असून शिक्षकांनी सत्यजित तांबे यांना मतदान का करावे, असा प्रश्न विचारत चांगलेच सुनावलं आहे. या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामध्ये सुधीर तांबे यांना तीन वेळेस मतदान करून देखील पेन्शनचा प्रश्न सोडवला नाही. 3 टर्म सुधीर तांबे यांना आमदार केलं. त्यांनी केवळ स्वतःला पेन्शन लागू करून घेतली. आता मुलागा सत्यजित लागू करून घेतील. मग सत्यजित यांच्यानंतर त्यांचा मुलगा, असेच चालत राहणार का, असा सवाल त्या शिक्षकाने केला आहे. आणि मतदार मूर्ख ठरू म्हणून आम्ही सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाही, असा पवित्रा शिक्षकांने घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com