तेजस ठाकरे राजकारणात प्रवेशासाठी सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ट्विटने चर्चा रंगल्या

तेजस ठाकरे राजकारणात प्रवेशासाठी सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ट्विटने चर्चा रंगल्या

तेजस ठाकरे यांचा आज २७ वा वाढदिवस आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

तेजस ठाकरे यांचा आज २७ वा वाढदिवस आहे. यानिमत्त शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे. यातच आता किशोरी पेडणेकर यांनी त्यांना शुभेच्छा देत म्हटले आहे की, निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार! असे पेडणेकर यांनी ट्विट केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com