तेलंगणात काँग्रेसचा मोठा विजय निश्चित! रेवंत रेड्डी बनणार मुख्यमंत्री? जाणून घ्या कोण आहेत ते?

तेलंगणात काँग्रेसचा मोठा विजय निश्चित! रेवंत रेड्डी बनणार मुख्यमंत्री? जाणून घ्या कोण आहेत ते?

तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 12 वाजेपर्यंतच्या कलांनुसार तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 12 वाजेपर्यंतच्या कलांनुसार तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. कलांमध्ये काँग्रेस 68 जागांवर आघाडीवर आहे. असाच कल राहिला तर पक्ष बहुमताचा आकडा गाठेल. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत आणि येथे सरकार स्थापनेसाठी 60 ची मॅजिक फिगर आहे. तर, काँग्रेसचे बहुमत निश्‍चित असल्याने आता संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यांबाबत चर्चा रंगू लागली आहे.

हे आहेत मुख्यमंत्र्यांचे संभाव्य चेहरे

ए. रेवंत रेड्डी

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी हे तेलंगणात मुख्यमंत्रीपदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत. रेवंत रेड्डी उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेत असतानाच त्यांनी अभाविपमध्ये प्रवेश केला. मात्र, नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचे सदस्यत्व घेतले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून टीडीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि सभागृहात पोहोचले.

2014 मध्ये, टीडीपीने त्यांना सभागृह नेते म्हणून निवडले. 2017 मध्ये रेवंत रेड्डी यांनी टीडीपी सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कोडंगलची जागा लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मलकाजगिरी येथून तिकीट दिले होते. या निवडणुकीत रेड्डी यांनी 10,919 मतांनी विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2021 मध्ये ते तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले.

एन उत्तम कुमार रेड्डी

एन उत्तम कुमार रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 1999 मध्ये त्यांनी कोडाड मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर चेंदर राव वेनपल्ली यांचा 7309 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2004 मध्येही त्यांनी ही जागा जिंकली होती. 2009 मध्ये त्यांची जागा बदलली पण त्यांनी विजयाचा सिलसिला कायम ठेवला आणि हुजूरनगर मतदारसंघातून आमदार झाले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्ये त्यांना नल्लारी किरण कुमार रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले

ही नावेही संभाव्य उमेदवार

के. जना रेड्डी, कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी, मल्लू भाटी विक्रमार्क, टी जीवन रेड्डी, रेणुका चौधरी आणि दामोदर राजनरसिम्हा यांची नावेही संभाव्य मुख्यमंत्री चेहऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com