ठाकरे-भाजप एकत्र? 'त्या' बॅनरवरुन शिंदे गटाची उध्दव ठाकरेंवर टीका, तर चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण

ठाकरे-भाजप एकत्र? 'त्या' बॅनरवरुन शिंदे गटाची उध्दव ठाकरेंवर टीका, तर चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण

ठाकरे गट-भाजप एकत्र येणार चर्चांना उधाण

पुणे : मालेगावात उद्धव ठाकरे यांची आज सभा होणार आहे. यापूर्वी मालेगावात ठाकरे गटाकडून वेगवेगळे बॅनर लावण्यात आले आहेत. यात काही उर्दू बॅनरदेखील आहेत. यावरुन शिंदे गट-भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. परंतु, याउलट भूमिका घेत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरेंची पाठराखण केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुन पुन्हा ठाकरे गट-भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

ठाकरे-भाजप एकत्र? 'त्या' बॅनरवरुन शिंदे गटाची उध्दव ठाकरेंवर टीका, तर चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण
शरद पवारांनी आता एनडीएसोबत यावं; आठवलेंचे थेट निमंत्रण, राहुल गांधींनी तोंड...

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आता आरोप-प्रत्यारोप खूप झाले. शद्ब वापरून काहीही होत नाही. लोकांना हे आवडत नाही, त्यामुळे आता हे थांबवलं पाहिजे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीयांना केले आहे. मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं असं होत नाही, मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगाव मध्ये बोर्ड लागले असतील, असे म्हणत त्यांनी उध्दव ठाकरेंची बाजू घेतली आहे. तर, ठाकरे-फडणवीस परत येण्याच्या कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय, असे काही चान्स नाहीत. पण, राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

राहुल गांधींबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राहुल गांधी आणि सावरकर यांचं काय आहे ते सारखी टीका करत असतात. मग, सावरकर यांच्यावर तेच का बोलतात? इतर काँग्रेसमधील कोणी बोलताना दिसत नाही. त्यांचे पर्सनल काही आहे का हे पाहावे लागेल, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

दरम्यान, मालेगावातील उद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दू बॅनर पाहून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन जर उद्धव ठाकरे त्यांचं लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल, असे त्यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com